बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी सुद्धा बऱ्याचदा मुख्यमंत्री झालो पण मला कोणत्याही राज्यपालांनी पेढा भरवलेलं आठवत नाही”

मुंबई | शिवसेनेत बंड करुन ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकार पाडलं. त्यानंतर भाजपशी संयुक्त युती करुन त्यांनी राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. या नवीन मंत्रीमंडळात एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. त्यानंतर त्यांनी आणि उपमुख्यमंत्री म्हणून निवड झालेले देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात शपथ घेतली. राज्यपालांनी त्यांना पदाची शपथ दिली. यावेळी त्यांनी त्यांना शुभेच्छा देत पेढा भरवला.

यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. पवार म्हणाले, मी अनेक वेळा मुख्यमंत्री झालो आहे, अनेक शपथविधी सोहळ्यात सहभागी झालो आहे. मात्र, मला आजपर्यंत कोणत्याही राज्यपालांनी पेढा भरवला नाही. किंवा पुष्पगुच्छ दिले नाहीत. मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा दूरचित्रवाणीवर पाहिला. राज्यपाल त्यांना पेढा खाऊ घालत होते आणि पुष्पगुच्छ देत होते.

तसेच, 2019 मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचे नेते जेव्हा शपथ घेत होते तेव्हा, मी तेथे उपस्थित होतो. आमच्या एका सदस्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतरांना स्मरण करुन शपथ घेत होते तेव्हा याच राज्यपालांनी त्यांना परत शपथ घ्यायला लावली होती. एकनाथ शिंदे यांनी मात्र मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांचा उल्लेख केला. राज्यपालांनी यावर आक्षेप घेतला नाही, असंही पवारांनी सांगितलं.

आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नावे मंत्रीमंजळाचा प्रस्ताव करुन पाठवला होता. वास्तविक मंत्रीमंडळाने दिलेल्या प्रस्तावावर राज्यपालांनी  मान्यता देणे हे बंधनकारक असून देखील अडीच वर्षे तो प्रस्ताव धुळ खात ठेवला. राज्यपालांचा हा निर्णय कितपत लोकशाहीला धरुन आहे याची चर्चा करायची गरज नाही. लोकांना हे सर्व ठाऊक आहे. असे म्हणत शरद पवारांनी राज्यपालांच्या एकंदरीत कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

थोडक्यात बातम्या –

“वडिलकीचा सल्ला देतो, देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्वप्नात देखील विश्वास ठेवू नका”

शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

राज्यातील ‘या’ भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज

“तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा हक्काने मला आदेश देत जा”

बंडखोर आमदारांबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More