बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उद्यापासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर

मुंबई | निसर्ग चक्रीवादळाने कोकणाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं आहे. या नुकसानाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवस कोकण दौऱ्यावर आहेत. 9 जूनला रायगड आणि 10 जून रत्नागिरी जिल्ह्यातील भागाची पाहणी करुन शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत.

निसर्ग या चक्रीवादळाचा तडाखा हा सर्वाधिक बसला तो रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला. अनेक शेतकऱ्यांचं, आंबा उत्पादकांचं मोठं नुकसान झालं आहे. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोकण दौरा केला. 100 कोटींची तातडीची मदत त्यांनी जाहीर केली. आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे उद्यापासून दोन दिवस कोकण दौऱ्यावर जात आहेत. इथल्या शेतकऱ्यांच्या समस्या ते जाणून घेणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जेव्हा रायगड दौरा केला तेव्हा त्यानंतर लगेचच त्यांच्यात आणि शरद पवारांमध्ये एक तातडीची बैठक झाली होती. कोकणातल्या नुकसानग्रस्तांना पुन्हा कसं उभं करायचं यावर चर्चा झाली.

रायगड, रत्नागिरी, पुणे आणि इतर जिल्ह्यातील शेतीचं झालेलं नुकसान कसं भरुन काढायचं, तसेच कोकणातल्या फळबागांना विशेष मदत देऊन या फळबागा उभ्या करण्याबाबत त्यांच्यात चर्चा झाल्याचं समजलं होतं. आता या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या कोकण दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोना संसर्गाबाबत चीनने केला मोठा खुलासा

दहावी बारावीच्या निकालासंदर्भात राज्य मंडळाच्या अध्यक्षांचा मोठा खुलासा, पाहा कधी लागणार निकाल…

महत्वाच्या बातम्या-

शेतकऱ्यांसाठी कृषितज्ज्ञांनी दिला ‘हा’ अत्यंत महत्त्वाचा सल्ला

“… तर मी स्वत: सामनाच्या कार्यालयात येऊन पाया पडायला तयार आहे”

“सोनू आम्हाला माफ कर, आम्हा राजकारण्यांमध्ये माणुसकी उरलेली नाही”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More