Top News

पक्ष विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी सुशीलकुमार शिंदेंना सुनावलं!

Loading...

जळगाव | मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे. माझ्या पक्षाची स्थिती मला माहिती आहे. सुशीलकुमार शिंदे हे त्यांच्या पक्षाबाबत बोलले असावेत, अशा शब्दात शरद पवारांनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना उत्तर दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत सुशीलकुमार शिंदे सांगू शकत नाहीत ते काँग्रेस पक्षाबाबत सांगू शकतात, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काँग्रेस पक्षात विलिनीकरण करण्याबाबतचं सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Loading...

सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यानंतर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी विलिनीकरण करण्याबाबत प्रतिक्रिया देण्याचं टाळलं आहे.

दरम्यान, विलिकरण करायचं की नाही. याबाबतचा निर्णय शरद पवार हेच घेऊ शकतात. सध्या आम्ही दोन्ही स्वतंत्र पक्ष म्हणूनच आमची भूमिका मांडत आहेत, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या- 

 

Loading...

 

 

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या