शिवसेनेच्या इशारा मोर्च्यावर राष्ट्रवादीचं सडकून टीकास्त्र; म्हणतात…

मुंबई | शिवसेनेचं आंदोलन म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचाच भात!, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या आजच्या इशारा मोर्च्यावर केली आहे.
शिवसेनेमध्ये हिंमत असल्यास पीक विमा कंपन्यांना 100% नुकसान भरपाई देण्यास भाग पाडा, असं आव्हान राष्ट्रवादीने शिवसेनेला दिलं आहे.
शिवसेनेकडून पीकविमा कंपन्यांच्या कार्यालयावर इशारा मोर्चा काढण्यात आला होता. यावर विरोधी पक्षांनी सडकून टीका केली आहे.
आगामी विधानसभेला निवडणुकीत भाजपने आपली साथ सोडली तर गोची होईल, अशी भीती उद्धव ठाकरेंना आहे. त्यामुळे ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय!’ अशी गत उद्धव ठाकरेंची झाली असल्याची बोचरी टीका राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.
सत्तेत राहून सत्ता उपभोगायची आणि सहकारी पक्षाला विरोध सुद्धा करायचा, हे कसलं राजकारण म्हणायचं? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा, यासाठी @ShivSena आंदोलन करतेय. पण @uddhavthackeray सरकारी धोरणांवर मूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे ही नौंटंकी म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचाच भात! pic.twitter.com/rUubsu7841
— NCP (@NCPspeaks) July 17, 2019
महत्वाच्या बातम्या-
-पराभवानंतर जडेजाला झाले अश्रू अनावर; बोलत राहिला ‘हे’ वाक्य…!
-2014ची UPSC टॉपर पण तिला केलं ‘या’ नावाने ट्रोल! विकृत मानसिकता समाजात कायम