बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाशिवआघाडीचंच सरकार येणार???; राष्ट्रवादीनं उचललंय हे महत्वाचं पाऊल

मुंबई | भाजपाला दूर ठेवण्यासाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र येत आहेत. सत्तास्थापनेच्या दृष्टीने समीकरणांची जुळवाजुळव आता सुरू झाली आहे. तिन्ही पक्ष एकत्र येण्याआधी किमान समान कार्यक्रम तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत राष्ट्रवादीच्या पाच नेत्यांचा समावेश आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक पार पडली. राष्ट्रवादीच्या या समितीत अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांचा समावेश आहे.

शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे वेगवेगळे जाहीरनामे आहेत. त्यामुळे सामायिक कार्यक्रम आखणं गरजेचं आहे. काँग्रेस-शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते विविध आश्वासनांवर आणि मुद्द्यांवर चर्चा करतील आणि त्यातून किमान समान कार्यक्रम तयार करतील, अशी माहिती कळतीये.

दरम्यान, महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा अभूतपूर्व पेच निर्माण झाल्यानंतर आता पुढे काय करायचं याचा निर्णय शरद पवारांच्या हाती असणार आहे, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More