Top News महाराष्ट्र मुंबई

“सेनापती ठाम उभा राहिला मात्र नियतीने त्यांच्या आईची इहलोकीची यात्रा काल संपवली”

मुंबई | राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई टोपे यांचे शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास दुख:द निधन झालं. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र अखेर काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 74 वर्षाच्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शारदाताईंना शब्दसुमनांची श्रद्धांजली अर्पित केली आहे.

शारदाताई टोपे यांच्या जाण्यामुळे प्रत्येक कोविडयोद्ध्यालाच शोक जाणवेल यात शंका नाही, ही सांत्वना व सहवेदना आपल्याला नवं बळ देईल, असं म्हणत शारदाताई टोपे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने श्रद्धांजली पाहिली आहे.

अवघ्या महाराष्ट्राला या मातृवंचनेची आंच जाणवली. कारण प्रत्येक कोविडयोद्ध्याला आई असते, कुटुंब असतं. पण आपल्या मनावर दगड ठेवून, स्वतःच्या जिवाची पर्वा न करता सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांसह, डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्यसेवक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी ते आशासेविकांपर्यंत सारेच लढतायत. या साऱ्यांनाच कर्तव्यभावनेची जाणीव करून देणाऱ्या प्रत्येक आईला सलाम राष्ट्रवादीने यानिमित्ताने सलाम केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय-

“राजेश टोपे यांच्या या दुःखद प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. कारण कोविड विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ह्या तरुण व उमद्या मनाच्या आरोग्यमंत्र्याने कर्तव्यदक्षतेने, अभ्यासपूर्ण व अतिशय संयतपणे महाराष्ट्रातील कोरोना महामारीची परिस्थिती हाताळली. मात्र नियतीने त्यांची परीक्षा पाहण्याचे ठरवले असावे. त्याचवेळी त्यांच्या आई असाध्य आजाराने रुग्णालयात मृत्युशी झुंजत होत्या. एकीकडे उदात्त मातृप्रेम व कौटुंबिक भावना खेचत होती तर दुसरीकडे एक आरोग्यमंत्री म्हणून महामारीशी दोन हात करणारा सेनापती म्हणून ठाम उभं राहायचं होतं. या दोन्ही कर्तव्यांना राजेश टोपे निर्धाराने सामोरे गेले. मात्र नियतीने त्यांच्या आईची इहलोकीची यात्रा काल संपवली.”

“अवघ्या महाराष्ट्राला या मातृवंचनेची आंच जाणवली. कारण प्रत्येक कोविडयोद्ध्याला आई असते, कुटुंब असतं. पण आपल्या मनावर दगड ठेवून, स्वतःच्या जिवाची पर्वा न करता सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांसह, डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्यसेवक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी ते आशासेविकांपर्यंत सारेच लढतायत. या साऱ्यांनाच कर्तव्यभावनेची जाणीव करून देणाऱ्या प्रत्येक आईला सलाम!”

“शारदाताई टोपे यांच्या जाण्यामुळे प्रत्येक कोविडयोद्ध्यालाच शोक जाणवेल यात शंका नाही. ही सांत्वना व सहवेदना आपल्याला नवं बळ देईल.
दिवंगत शारदाताई अंकुशराव टोपे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!”

महत्त्वाच्या बातम्या-

3 अनाथ मुलांच्या मदतीला सोनू सूद धावला, घेतली त्यांची सगळी जबाबदारी!

कोरोनाच्या संकटात पुण्यातील गणेशोत्सव मंडळाकडून समाजापुढे नवा आदर्श, घेतला महत्त्वाचा निर्णय!

तो आशीर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील, राजेश टोपेंचं भावनिक ट्विट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या