Top News विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी; तिन्ही पक्षांचं सरकार स्थापनेच्या दिशेने एक पाऊल पुढे!

मुंबई |  राज्यात नव्या राजकीय पर्वाला सुरुवात सुरूवात झाली आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राज्यात सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. गुरूवारी तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक पार पडली. संयुक्त बैठकीत चर्चेअंती किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडलं आहे, अशी प्रतिक्रिया तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी यावेळी दिली.

संयुक्त बैठकीला राष्ट्रवादीचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, नवाब मलिक तर काँग्रेकडून ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे आणि शिवसेनेकडून गटनेते एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई हे या चर्चेला उपस्थित होते.

कॉमन मिनीमम प्रोग्राम तयार झाला आहे. त्यावर चर्चा देखील झाली आहे. अंतिम शिक्कामोर्तबासाठी मसुदा तिन्ही पक्षांच्या श्रेष्ठींकडे पाठवला जाईल. त्यानंतर पुढील कार्यवाहीचे आदेश प्राप्त होतील, असं या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

दरम्यान, किमान समान कार्यक्रम आणि सत्तेतील सहभाग यावर या बैठकीत सविस्तरपणे चर्चा झाल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या