“आजारी बापटांना प्रचारात उतरवून भाजप त्यांच्या जीवाशी खेळतंय”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | पुण्यातील कसबा पेठ (Kasba) आणि पिंपरी चिंचवडची (Chinchwad) पोटनिवडणूक भाजपसाठी अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. यामुळे भाजपने अंथरुणाला खिळून असलेले खासदार गिरीश बापट यांना शेवटच्या टप्प्यात प्रचारात उतरवलं आहे.

नाराजीच्या चर्चांनंतर गिरीश बापट ऑक्सिजन सिलेंडर लावून कसब्याच्या प्रचाराला पोहोचले आहेत. मात्र आजारी बापटांना प्रचाराला आणून भाजप त्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय.

फडणवीसांनी रुग्णालयात बापटांची भेट घेतली. त्यानंतर ऑक्सिजन सिलेंडर लावत बापट कसबा मतदारसंघात आले. मात्र आजारी बापटांना प्रचारात उतरवून भाजप त्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप केला जातोय.

कसबा पेठेच्या जागेसाठी 26 फेब्रुवारीला मतदान होत आहे. बापट तब्बल सहा वेळा या मतदार संघातून आमदार झाले होते. त्यांचे वर्चस्व या मतदार संघावर आहे. यामुळे त्यांच्या भाषणा दरम्यान महिलांना अश्रू अनावर झाले.

गेली तीन महिने प्रकृती बरी नसल्याने मी खूप कमी काम केलंय. मला आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावा लागत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी बाहेर न फिरण्याचा सल्ला दिलाय. या निवडणुकीत मी वैयक्तिकरित्या मतदारसंघात फिरून प्रचार करू शकणार नाही, असं बापट म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-