वेड्यांचा बाजार, पेढ्यांचा पाऊस; राष्ट्रवादीचा महाजनांवर पोश्टर हल्ला

पुणे | पुण्यातील कालवा फुटण्याला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उंदीर, घुशी आणि खेकडे जबाबदार धरले. त्यावर राष्ट्रवादीने उपहासात्मक पोस्टरबाजी करत टीका केली आहे. 

उंदीर, घुशी आणि खेकडे यांनी भिंत पोखरल्यामुळे पुण्याचा कालवा फुटला, वेड्याचा बाजार, पेढ्यांचा पाऊस’, असा आशय पोश्टरवर लिहिण्यात आलं आहे. हे फ्लेक्स राष्ट्रवादीने जेधे चौकात लावले आहेत. 

दरम्यान, महाजनांनी केलेल्या विधानामुळे सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात आधीच रोष व्यक्त होत आहे. त्यात आता यावरून राजकारण पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-शरद पवारांनी आपला खरा चेहरा दाखवला; प्रकाश आंबेडकरांचं टीकास्त्र

-गाडी थांबवली नाही म्हणून थेट गोळी झाडली; उत्तर प्रदेश पोलिसांचा प्रताप

-…नाहीतर यावेळी मंत्र्यांना सोडणार नाही; राजू शेट्टींचा सरकारला इशारा!

-पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अध्यात्मिक गुरू सांगणाऱ्यास अटक!

-सायनाच्या बायोपिकमधील श्रद्धाचा फर्स्ट लुक एकदा पहाच…