मुंबई | दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील भाजपचे अनेक नेते दिल्लीत गेले आहेत. माजी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे हे दिल्लीत जोरदार प्रचार करत आहेत. यावरून राष्ट्रवादीने भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
भाजप दिल्ली जिंकण्यासाठी आता महाराष्ट्राचं प्रचार कार्ड वापरत आहे. मात्र ज्यांना महाराष्ट्राने नाकारलं ते दिल्ली कशी जिंकून देणार?, असा सवाल करत राष्ट्रवादीने भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
दिल्ली निवडणुकीचा भाजपने ने प्रचंड धसका घेतला असून दिल्ली आता आपल्या हाती लागणार नाही असंच जणू त्यांना वाटत आहे. यामुळे भाजपने आपल्या सभांची संख्या दुप्पट केली आहे, असा टोला राष्ट्रवादीने भाजपला लगावला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील जवळपास 25 नेत्यांवर दिल्लीतील प्रचाराची जबाबदारी दिली आहे. प्रामुख्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे हे प्रचारासाठी दिल्लीत आहेत.
भाजपा दिल्ली जिंकण्यासाठी आता महाराष्ट्राचं प्रचार कार्ड वापरत आहे. पण ज्यांना महाराष्ट्राने नाकारलं ते दिल्ली कशी जिंकून देणार हा प्रश्नच आहे. @BJP4India @BJP4Maharashtra @AmitShah @JPNadda @Dev_Fadnavis @ChDadaPatil @Pankajamunde
— NCP (@NCPspeaks) February 5, 2020
दिल्ली निवडणुकीचा @BJP4India ने प्रचंड धसका घेतला असून दिल्ली आता आपल्या हाती लागणार नाही असेच जणू त्यांना वाटत आहे. यामुळे भाजपाने आपल्या सभांची संख्या दुप्पट केली आहे, तर महाराष्ट्रातील @Dev_Fadnavis, @ChDadaPatil, @Pankajamunde यांच्यासारख्या नेत्यांची फौज दिल्लीला बोलवली आहे. pic.twitter.com/zJo3YoPFjW
— NCP (@NCPspeaks) February 5, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
काॅंग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले हर्षवर्धन पाटील आता शिवसेनेच्या वाटेवर?
माझ्या जीवाला धोका आहे असं म्हटलंच नाही; आव्हाडांच स्पष्टीकरण
महत्वाच्या बातम्या-
शाहीन बागमध्ये ‘जालियनवाला बाग’ होऊ शकतो; ओवैसींना संशय
चिंचवडमध्ये समभाव चित्रपट महोत्सव उत्साहात संपन्न
“बच्चू कडू…तुमच्यासारखा वाघ शेंबड्या ठाकरे सरकारमध्ये शोभत नाही”
Comments are closed.