बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

15 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला नकाशाची काय गरज?, मोदींवर टीका; राष्ट्रवादीनं दाखवला पवारांचा व्हिडीओ

मुंबई | तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसानीची पाहणी करण्यासाठी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात दौरा केला. या दौऱ्या दरम्यानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानात बसून हवाई दौरा करत असताना पाहायला मिळत आहेत.

हवाई दौऱ्या दरम्यान नकाशा हातात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहणी करत असताना दिसून येत आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने टीका केली असून 15 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला नकाशा कशाला हवा? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच स्वतःच्या राज्याची माहिती नसलेला व्यक्ती आज देशाचा पंतप्रधान आहे, असा खोचक टोलाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोशल मीडियावरून लगावला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोशल मीडियावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक व्हिडिओ जारी करून मोदींवर निशाणा साधला आहे. या व्हिडिओमध्ये शरद पवार हे विमानातून प्रवास करत असताना शेजारी बसलेल्या तरुणाला विमानातूनच खाली दिसणाऱ्या चाकण एमआयडीसी तेथील शेती आणि तिथल्या लोकांबद्दलची माहिती सांगत असताना पाहायला मिळत आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना ‘विमानात नुसते नकाशा पाहून चमकोगिरी करताना पंतप्रधान मोदी यांचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत’, अशी टीका या माध्यमातून करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात आता राष्ट्रवादीला भाजपकडून कसं प्रत्युत्तर मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सदरील व्हिडिओ हा एनसीपी महाराष्ट्र अपडेट्स या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ –

थोडक्यात बातम्या –

दोन कोटी लसी जमिनीतून उगवल्या का?- देवेंद्र फडणवीस

सकाळी वडील आणि दुपारी मुलीचा कोरोनाने केला घात; नेमबाज मोनाली गोऱ्हे अनंतात विलीन

महिला क्रिकेटपटूच्या मदतीला विराट कोहली धावला; केली ‘इतक्या’ लाखांची मदत

मुल होत नाही म्हणून पतीने उचललं अत्यंत धक्कादायक पाऊल!

दिलासादायक! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या तिपटीने अधिक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More