मुंबई | पुढच्या महिन्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून परभणीचे ज्येष्ठ नेते बाबाजाणी दुर्राणी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज निवडूण येणार आहे. पण माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे रायगडमधून लोकसभेची निवडणुक लढवणार आहे. त्यामुळे येथे कोणता उमेदवार असणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती.
दरम्यान, उस्मानाबाद-बीड-लातूरच्या जागेसाठी बाबाजानी दुर्राणी यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं. त्यामुळे ते नाराज होते. यावेळी मात्र त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-… तर एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही- राजू शेट्टी
-राष्ट्रवादीच्या नेत्याच्या हत्येचा कट फसला; काँग्रेसचा नगरसेवक फरार!
-गिरीश महाजनांसमोर खडसेंनी घेतलं झुकतं माप!
-शरद पवारांच्या ‘या’ वक्तव्यामुळे राहुल गांधींच्या स्वप्नावर गदा
-राज ठाकरेंचा पक्ष संपला आहे; रामदास कदमांचा निशाणा