Top News

राष्ट्रवादीतील आणखी एक बडा नेता भाजपच्या गळाला???

कोल्हापूर | आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षांतर करुन राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. आता कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिकही राष्ट्रवादीला रामराम ठोकणार असल्याचं कळतंय. धनंजय महाडीक या महिन्याच्या अखेरीस भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडीक यांच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काम केल्यामुळे ते नाराज असल्याचं बोललं जात आहे. धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली तर हा पक्षाला मोठा धक्का असणार आहे.

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, रामराजे निंबाळकर, राहुल नार्वेकर, दिपक चव्हाण हे राष्ट्रवादीला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडणार असल्याचं दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-

“उदयनराजे माझे मोठे भाऊ आहेत, मी कोणत्याही पक्षात असलो तरी मला मदत करतील”

-पूरग्रस्तांसाठी शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

-भीक नको म्हणणाऱ्या छत्रपती संभाजीराजेंना विनोद तावडे यांचं प्रत्युत्तर…!

-पी. चिदंबरम यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यत

-सरकार आपल्या डोक्यावर मिरच्या वाटतंय- खासदार अमोल कोल्हे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या