बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ नेत्याची गृहमंत्रिपदी नेमणूक करा; मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना पत्र

मुंबई | अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात खातेपालटाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना यासंदर्भात पत्र लिहून काही सूचना केल्या आहेत. या पत्रातील महत्त्वाची माहिती आता समोर आली असून कोणत्या नेत्याकडे कोणतं मंत्रिपद जाणार हे आता स्पष्ट झालं आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील सध्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपद सोपवावं, असं मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. याशिवाय दिलीप वळसे पाटील यांच्याकडे असलेलं कामगार मंत्रिपद हसन मुश्रीफ यांच्याकडे तर उत्पादन शुल्क मंत्रिपद अजित पवार यांच्याकडे सोपवाव, असंही या पत्रात म्हटलं आहे.

वळसे पाटील यांच्याशिवाय अजित पवार, जयंत पाटील, हसन मुश्रीफ तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची नावे गृहमंत्रिपदासाठी चर्चेत होती, मात्र शरद पवार यांनी आपले अत्यंत विश्वासू आणि जवळचे दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपद देण्याचा निर्णय घेतला.

दिलीप वळसे पाटील अनुभवी आणि मुत्सद्दी राजकारणी म्हणून ओळखले जातात. याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये देखील त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली आहे. याशिवाय शरद पवारांचे अत्यंत विश्वासू असल्याचा फायदा त्यांना झाला आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोनाबाधित आईसोबत राहण्यासाठी मुलाचा हंबरडा, जिल्हाधिकाऱ्याचे धरले पाय!

कोब्रा कमांडो नक्षलवाद्यांच्या ताब्यात; सहिसलामत सोडण्यासाठी घातली ‘ही’ अट

कोरोनावर मात करण्यासाठी शरद पवारांनी जनतेला केलं ‘हे’ आवाहन

आता नक्षलवाद्यांचं काही खरं नाही; अमित शहा म्हणाले…

योगी आदित्यनाथांनी शिवी दिल्याचा आरोप; ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More