बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवारांनी अहमदाबादमध्ये जाऊन अमित शहांची भेट घेतली?; राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अहमदाबादमध्ये भेट घेतल्याची बातमी नुकतीच एका गुजराती वृत्तपत्राने प्रकाशित केली. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु या भेटीवर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते तसेच अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिक यांनी या प्रकरणात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या भेटीची बातमी ही केवळ अफवा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपने ही अफवा पसरवली असल्याची टीकाही यावेळी मलिकांनी केली आहे.

अहमदाबाद येथुन शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे थेट मुंबईला आले आणि त्यांनी कोणाचीही भेट घेतली नसल्याचं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुुळे राष्ट्रवादीतर्फे ही भेट झाली नसल्याचा दावा करण्यात येत असून आता ही निव्वळ अफवा असल्याचं आणि भाजपचं हे षडयंत्र आहे, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी पाहता शरद पवार आणि अमित शहा यांच्या भेटीच्या बातमीने अनेक चर्चांना उधाण आलं होतं, परंतू त्यांची भेट झाली नसल्याचं राष्ट्रवादीकडुन सांगण्यात येत असलं तरी, ही गुप्त भेट असु शकते, पण या भेटीमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं लगेच बदलण्याची काहीच चिन्ह नसल्याचं मत काही राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

स्वत:ला ग्रेट दाखवायची धडपड! राष्ट्रवादीच्या आमदाराचं थेट कोरोना रुग्णासोबत फोटोसेशन

2 तारखेनंतर मुख्यमंत्री लॉकडाऊनबद्दल निर्णय घेतील, राजेश टोपेंनी दिले संकेत!

संजय राऊतांनी ट्विट करत दिला सूचक इशारा, म्हणाले…

“25 वर्षावरील सहव्याधीग्रस्त तरुणांनाही कोरोना लस द्या”

खळबळजनक बातमी; महाविकास आघाडीतील 2 ज्येष्ठ नेत्यांची अमित शहांसोबत गोपनीय बैठक?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More