महाराष्ट्र मुंबई

राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसेंना विधान परिषदेवर संधी!

मुंबई | महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली आहे.

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री अनिल परब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी या तिन्ही मंत्र्यांनी आपआपल्या कोट्यातील राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांना दिली.

राष्ट्रवादीकडून राज्यपाल नामनिर्देशित आमदार म्हणून खडसे यांचं नाव जवळपास निश्चित केलं आहे. सहकार आणि समाजसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याने राष्ट्रवादीने त्यांची निवड केल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून इतर 3 जणांना विधान परिषदेवर संधी दिली जाणार आहे. यामध्ये गायक आनंद शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, साहित्यिक, प्रा. यशपाल भिंगे यांचीही नावं जवळपास निश्चित झाली आहेत.

महत्वाच्या बातम्या-

अर्णब गोस्वामींना दिलासा नाही; आजची रात्रही तुरुंगात काढावी लागणार

…म्हणून भाजप आमदार महेश लांडगेंना थेट अजितदादांनाच करावी लागली विनंती!

‘आदित्य ठाकरे आपण लपूनछपून उत्तर देण्यापेक्षा थेट चर्चेला या’; शेलारांचं आदित्य ठाकरेंना आव्हान

राज्यघटनेनुसार कृषीविषयक कायदे करण्याचा अधिकार केंद्राला नाही- पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र सरकारला मोठा झटका; अर्णब गोस्वामींबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिले ‘हे’ आदेश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या