बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खासदार अमोल कोल्हेंकडे राष्ट्रवादी काँग्रेस सोपवणार मोठी जबाबदारी

पिंपरी | शिरुर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस मोठी जबाबदारी टाकणार आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पिंपरीत यासंदर्भात सुतोवाच केलं आहे.

अमोल कोल्हे लोकसभेत महाराष्ट्रातल्या महत्वाच्या प्रश्नांकडे सर्वांचंच लक्ष वेधून घेतात.  अल्पावधीतच ते राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांमध्ये गणले जात आहेत.

शेतकऱ्यांचे, बैलगाड्यांचे प्रश्न त्यांनी संसदेत मांडले आहेत. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केलं आहे, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे राष्ट्रवादी कोणती महत्वाची जबाबदारी देणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.

महत्त्वाच्या बातम्या-

-पक्षाची बदनामी टाळण्यासाठी महिला पदाधिकाऱ्यांच्या विनयभंगाकडे भाजपचं दुर्लक्ष?

-पहिल्याच भाषणात कार्यकर्त्याला रडू कोसळलं; अन् सावरायला सरसावले धनंजय मुंडे

-तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केला नसेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी!

-लायकी नसलेले लोक सुद्धा सावरकरांवर टीका करतात- विक्रम गोखले

-सरकार पडू नये म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत लढलेला काँग्रेसचा नायक!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More