नाशिक महाराष्ट्र

राष्ट्रवादीने ठरवलंय, कुठल्याही परिस्थितीत भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाणांना पाडायचं!

नाशिक | राष्ट्रवादीने ठरवलंय, कुठल्याही परिस्थितीत भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाणांना पाडायचं! नाशिक मतदारसंघात आदिवासी मतदार मोठ्याप्रमाणात असून गेल्या तीन निवडणुकांपासून याठिकाणी भाजपची सत्ता आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच मतदारसंघात भाजपला मजबूत आव्हान देण्याचा प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून केला जात आहे. 

भाजपचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे गेली तीन निवडणुकांपासून याठिकाणी निवडून आले आहेत. परंतु आगामी निवडणुकीत मात्र चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं तगडं आव्हान देण्याचं ठरवलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दिंडोरीचे शिवसेनेचे माजी आमदार धनंजय महाले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून महाले किंवा डॉ.भारती पवार यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मनसे पदाधिकाऱ्याला 6 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक

नरेंद्र मोदींच्या डोक्यावर ‘राफेल’चं भूत, ‘हिंदू’च्या बातमीने भाजपचे कंबरडे मोडले!

“आम्ही तयार केलेल्या रस्त्यांवर 200 वर्ष तरी खड्डे पडणार नाहीत”

बिहारचे युवक नसते तर महाराष्ट्राचे कारखाने बंद झाले असते- सुशीलकुमार मोदी

-कोल्हापूरची जागा काँग्रेसनं स्वत:कडे घ्यावी- सतेज पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या