खेळ

धोनी कर्णधार होण्यामागे शरद पवारांचा होता हात, आव्हाडांनी सांगितलेलं ते टॉप सिक्रेट पुन्हा चर्चेत!

मुंबई |  भारताचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 15 ऑगस्टच्या संध्याकाळी त्याने इन्टाग्राम पोस्ट लिहित आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करत असल्याची घोषणा त्याने केली आहे. त्याच्या निवृत्तीने एका दिमाखदार आणि भव्य क्रिकेट युगाचा अस्त झालाय. (NCP Jitendra Awhad Facebook Post On Mahendra Sing Dhoni And Sharad Pawar)

महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्याची कहाणी खूप प्रेरणादायी आहे. एका छोट्याशा खेडेगावातून येऊन रांचीच इवलंस असणारं नाव त्याने भारताच्या नकाशावर ठळक अक्षरात आणलं. रेल्वे टी.सी. पासून सुरूवात करून जगातला सर्वोत्तम फिनिशरपैकी एक एवढी मजल त्याने मारली. परंतू या सगळ्या प्रवासामधला कॅप्टन होण्याचा त्याचा प्रवास चर्चेचा विषय राहिलेला आहे. त्याच्या याच प्रवासाचं सिक्रेट राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांवरील लिहिलेल्या एका लेखात सांगितलं होतं.  (NCP Jitendra Awhad Facebook Post On Mahendra Sing Dhoni And Sharad Pawar)

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं….

“2008 चा तो काळ होता.BCCI चे अध्यक्ष होते पवार साहेब. भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर होता.त्यावेळी संघाचा कर्णधार होता आपल्या सर्वांचा आवडता खेळाडु राहुल द्रविड.पवार साहेब देखील Bcci अध्यक्ष या नात्याने आपल्या संघाचा खेळ पाहण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर होते.

दौरा सुरू असताना एक दिवस अचानक राहुल द्रविड पवार साहेबांना भेटायला आला.साहेब ब्रेकफास्ट करत बसले होते.साहेबांनी द्रविडच स्वागत केलं आणि अचानक येण्याचं प्रयोजन विचारलं.द्रविड साहेबांना, “मला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा..!” असे म्हणाला. चालु दौऱ्यात द्रविड सारखा खेळाडू अशी मागणी करतोय हे पाहून साहेबांना नाही म्हटलं तरी थोडा धक्का बसला. यावर साहेबांनी द्रविड ला विचारले की, “इंग्लंड दौरा सुरू असताना,आणि या दौऱ्यावर तू कॅप्टन असताना असा तडकाफडकी निर्णय कसा घेता येईल..? दुसरं म्हणजे हे निर्णय मी घेत नाही.यासाठी तू निवडसमितीकडे जायला हवं..कारण हा निर्णय पूर्णतः निवड समितीचा असतो…!”

तरीदेखील द्रविडने साहेबांकडे,”मला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मोकळीक द्या,माझ्या व्यक्तिगत कामगिरीवर या जबाबदारीमुळे परिणाम होतो” हा धोशा कायम ठेवला. तो ऐकत नाही म्हटल्यावर साहेबांनी द्रविडला पर्यायी कर्णधाराच नाव सुचवायला सांगितले.द्रविडणे यावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच नाव साहेबांना सुचवलं. साहेबांनी मग सचिनला कर्णधारपदाच्या जबाबदारीबद्दल विचारलं.सचिनने देखील कामगिरीच कारण देत कर्णधारपद स्वीकारण्यास प्रांजळपणे नकार दिला.

दौरा सुरू होता आणि या दौऱ्यात संघाचे दोन्ही दिग्गज खेळाडू कर्णधारपदासाठी तयार नव्हते.शेवटचा उपाय म्हणून साहेबांनी मग त्या दोघांनाच योग्य व्यक्तीच नाव सुचवायला सांगितले. आणि आश्चर्य म्हणजे दोघांनी मिळून एकच नाव घेतले. ते नाव होत महेंद्रसिंग धोनी.

साहेबांनी यावर विचार केला. सचिन आणि द्रविड सारखे खेळाडू धोनी च नाव घेतायत म्हटल्यावर साहेबांनी मोठ्या विश्वासाने हे नाव निवडसमितीला सुचवलं. दिलीप वेंगसरकर त्यावेळी निवड समितीचे अध्यक्ष होते.धोनीच्या नावावर सचिन ,राहुल आणि खुद्द Bcci अध्यक्ष शरद पवार यांची संमती होती.निवड समितीने धोनीला कर्णधार बनवत असल्याचा निर्णय जाहीर केला..! पुढे याच महेंद्रसिंग धोनीने भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात इतिहास घडवला.”

गेल्या अनेक दिवसांपासून महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबद्दल चर्चा रंगल्या होत्या. काहीवेळा त्याला निवृत्तीसंदर्भात प्रश्नही विचारण्यात आले होते. मात्र तेव्हा, ‘ज्यावेळी योग्य वेळ येईल तेव्हा मी माझा निर्णय जाहीर करेन’ असं धोनीने म्हटलं होतं. अखेर काल भारतीय टीमचा कॅप्टन कूल धोनीने निवृत्ती जाहीर केलीये. NCP Jitendra Awhad Facebook Post On Mahendra Sing Dhoni And Sharad Pawar)

महत्त्वाच्या बातम्या-

कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

‘आयसीसी’नं महेंद्रसिंग धोनीसाठी ट्विट केला खास व्हिडीओ

‘हे’ चार वर्ल्ड रेकॉर्ड आहेत केवळ महेंद्र सिंग धोनीच्या नावे

धोनीच्या निवृत्तीवर विराटची भावूक प्रतिक्रिया, म्हणाला…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या