मुंबई | जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप एका तरूणाने केला आहे. कालपासून हे प्रकरण बरंच तापलं आहे. अशातच जितेंद्र आव्हाड यांना तुझा दाभोळकर होणार, अशी धमकी एका तरूणाने दिली आहे. यामुळे एकच खळबळ माजली आहे.
कालपासून आव्हाड यांच्यावर सोशल मीडियातून टीका सुरू आहे. तर त्यांच्या समर्थकांनी याप्रकरणाचं समर्थन देखील केलं आहे. अशातच ट्विटरवर कैलासराणा गणेश सुर्यवंशी याने आव्हाड लवकरच तुझा दाभोलकर होणार अशी कमेंट करत धमकी दिली आहे.
शेम ऑन जितेंद्र आव्हाड असा ट्रेंड ट्विटरवर सुरू होता. त्याच ट्रेंडमध्ये या तरूणाने हे धमकी देणारं ट्विट केलं आहे. त्यामुळे पोलिस आता काय कारवाई करणार, याकडे सगळ्यांच्याच नजरा आहेत.
दरम्यान, याप्रकरणी राष्ट्रवादी आता पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याची माहिती कळत आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“मुंबई अडीच लाख कोटी केंद्राला देते, त्यातील 25 टक्के महाराष्ट्राला द्या”
358 तहसील आणि 44 हजार गावं तर एका गावाला किती शिवथाळी??; भाजपचा सवाल
महत्वाच्या बातम्या-
डोनाल्ड ट्रम्प यांचा सूर पालटला; आता म्हणतात, ‘नरेंद्र मोदी महान नेते!’
तरुण मारहाण प्रकरणी भाजपनं जितेंद्र आव्हाडांना विचारले ‘हे’ चार प्रश्न!
अखेर मारहाणीच्या प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांनी मौन सोडलं…
Comments are closed.