Top News

परिवर्तन करायला निघालेल्या राष्ट्रवादीच्या कोल्हापुरातील सभेत राडा

कोल्हापूर | राज्यात परिवर्तन सभा घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या कोल्हापुरातील सभेत मात्र जोरदार राडा झाला आहे. या राडेबाजीमुळे पक्षातच परिवर्तनाची गरज असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं. 

खासदार धनंजय महाडिक भाषणाला उभे राहताच हसन मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे महाडिक नाराज होऊन खाली बसले.

हसन मुश्रीफांनी आपल्या कार्यकर्त्यांना समजावलं. त्यानंतर त्यांनी महाडिकांना भाषण करण्याची विनंती केली, मात्र ते भाषणाला उठत नव्हते. अखेर त्यांना हाताला धरुन भाषणाला उठवण्याची वेळ राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आली.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार हे या सभेला उपस्थित होते. त्यांच्या समोर हा प्रकार घडल्यानं आता या प्रकाराची चांगलीच चर्चा आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-कुमारस्वामींनी दिली मुख्यमंत्रीपद सोडण्याची धमकी 

-धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच हेलिकाॅप्टर भरकटलं!

-कर्जत नगर परिषदेवर युतीचा झेंडा

-निवडणूक लढणे म्हणजे काही सौंदर्य स्पर्धा नव्हे- मोदी

-“संघाचं आमंत्रण स्वीकारल्यामुळंच प्रणव मुखर्जींना ‘भारतरत्न’ मिळालं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या