बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उपद्व्यापी लोकांना संकटकाळात महाराष्ट्राच्या हिताचा योग्य मार्ग सुचो”

मुंबई |  कोरोनाच्या संकटकाळात राज्य शासनाला आणि प्रशासनाला सहकार्य करायचं सोडून भाजप गलिच्छ उद्योग करत आहेत, अशी टीका करत या संकटाच्या काळात उपद्व्यापी लोकांना महाराष्ट्राच्या हिताचा योग्य मार्ग सुचो, असा टोला राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडीमधील नेता चाल खेळतो आहे, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यावरच प्रतिक्रिया देताना अमोल मिटकरी यांनी भाजपचा जोरदार समाचार घेतला आहे.

वय वाढत गेलं अन् एखाद्याने गंभीर आजाराचा धसका घेतला तर बुद्धीला कसे उपद्व्याप सुचतात याचं हे ज्वलंत उदाहरण, अशी टीका त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे. राज्य एकीकडे जीवघेणा संघर्ष करत आहे. मरू की जिवंत राहु हे निश्चित सांगता येत नाही. जीवनमरणाचा संघर्ष रोज सुरु असतांना, प्रशासनाला मदत करायची सोडुन इतकं गलिच्छ राजकारण फक्त भाजपाच करू शकते याचा आज परत प्रत्यय आला, असं मिटकरी म्हणाले.

सत्ता नसली की माणूस कसा अस्वस्थ होतो व सत्तेविना जीव कसा गुदमरतो याचंच हे जिवंत व ज्वलंत उदाहरण म्हणता येईल. राज्यसरकार सर्व परिस्तिथीवर लक्ष ठेवुन आहेच मात्र अशा वेळी या नेत्यांच्या उपद्व्यापांवर महाराष्ट्रातील जनता देखील लक्ष ठेवुन आहे हे भाजपाने कधीच विसरू नये. अशा उपद्व्यापी लोकांना या संकटकाळात महाराष्ट्राच्या हिताचा योग्य मार्ग सुचो अशी अपेक्षा करूया, असं ते म्हणाले. तसंच पसायदानातील एक सुंदर ओवी कदाचित यांच्यासाठीच असं म्हणत
जे ‘खळां’ची व्यंकटी सांडो l तया सत्कर्मी रती वाढो ll या ओवीच्या माध्यमातून भाजप नेत्यांना त्यांनी टोला लगावला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More