अकोला | मराठा आंदोलनाच्या दृष्टीकोनातून 9 डिसेंबर हा महत्वाचा दिवस आहे. यातून काही नक्कीच सकारात्मक होईल, अशी आम्हाला अपेक्षा असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडी सरकार नेहमी मराठा आंदोलनाच्या बाजूने आहे. त्यामुळे कोणत्याही आरक्षणाला धक्का न लागता एक चांगला निर्णय येईल, अशी आशा असल्याचं मिटकरी म्हणाले. टीव्ही9 या वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
मराठा आरक्षणाअंतर्गत 2020 आणि 2021 मध्ये वैद्यकीय प्रवेश प्रकिया आणि नोकरी भरती करता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे.
दरम्यान, न्या.अशोक भूषण, न्या. नागेश्वर राव, न्या. अब्दुल नजीर, न्या. हेमंत गुप्ता, न्या. रवींद्र भट हे न्यायमूर्ती खंडपीठावर आहेत.
थोडक्यात बातम्या-
…तर आम्ही आरक्षण सोडायला तयार- रामदास आठवले
राहुल गांधींसह विरोधी पक्षाचे 5 बडे नेते राष्ट्रपतींना भेटणार!
…म्हणून आम्ही पवार साहेबांना भेटलो- रत्नाकर गुट्टे
शिर्डी नगरपंचायत हद्दीमध्ये येण्यास तृप्ती देसाई यांना बंदी!
कृषी कायद्यावर चर्चा होऊच शकत नाही, तो मागेच घ्यावा लागेल- मेधा पाटकर