बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देवेंद्र फडणवीस म्हणजे राजकारणातील सर्वात लबाड माणूस”

मुंबई | गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल गोटे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिखट शब्दात गंभीर टीका केली आहे. गोटे यांनी केलेल्या टीकेमुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

‘देवेंद्र फडणवीस म्हणजे राजकारणातील सर्वात लबाड माणूस आहेत’, असं म्हणत अनिल गोटे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीसांनी जनतेचा पाठिंबा असलेले नेते संपवण्याचे काम केलं असं देखील यावेळी गोटे यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावरही यावेळी गोटे यांनी टीका केली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मास लीडर नाहीत, त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनाही अनिल गोटे यांनी टोला लगावला आहे. राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे हे आज मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी भाजप नेत्यांवर गंभीर टीका केली.

यावेळी बोलत असताना अनिल गोटे यांनी आपल्या पक्षातील नेत्यांनाही घरचा आहेर दिल्याचं पाहायला मिळालं. सत्तेत असणारे काही नेते हे स्वतःहून माध्यमांना खाद्य पुरवीत असल्याचं म्हणत हे सर्व शोभादायक नसल्याचं अनिल गोटे यांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More