राष्ट्रवादीच्या सरपंचावर गावकऱ्याचा लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप!

पंढरपूर | राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला सरपंचाकडून गावकऱ्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनिता नामदेव भोसले असं या महिला सरपंचाच नाव आहे. माढा तालुक्यातील तांदूळवाडी गावात ही घटना घडली आहे.

सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही. तरीसुद्धा महिला सरपंच अनिता नामदेव भोसले यानी स्वच्छ भारत अभियान योजनेतून शौचालयासाठी अनुदान घेतलं. त्यामुऴे गावातील ग्रामस्थ सुरेश गवळी यानी काही दिवसापूर्वी याबाबत सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली. 

दरम्यान, हा राग मनात धरून त्यानी गावातील चौकातच तक्रारदार सुरेश गवळी यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेनंतर सरपंच अनिता भोसले यांच्याविरोधात सुरेश गवळी यांनी मारहाणीचा आरोप करत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मुंडेंनी भाषणबाजी बंद करून नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान करावा!

-भाजपच्या ‘या’ तीन प्रवक्त्यांना माध्यमांसमोर बोलण्यास भाजपकडून बंदी!

-मुख्यमंत्रीसाहेब…हीच का तुमची पार्टी विथ डिफरन्स? धनंजय मुंडेंचा सवाल

-#MeTooमोहीमेमुळे पुरूषांनी महिलांवर आरोप केले तर काय होईल?- केंद्र मंत्र्यांची मुक्ताफळं

-मला मिठाई देणार का? मोदींचा लाभार्थ्यांना मराठीतून सवाल!