ज्यांनी मला अटक केली त्यांनाच माझ्या अटकेचं कारण माहित नाही! – छगन भुजबळ

ठाणे |भाजप सरकारने माझ्याविरोधात कट रचून मला जाणीवपूर्वक ‘महाराष्ट्र सदन’ प्रकरणात अडकवले. पण मला ज्यांनी अटक केली त्यांनाच माझ्या अटकेचं कारण माहित नाही, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भाजप सरकारवर केला आहे.

ठाण्यात अखिल भारतीय माळी महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी भुजबळ आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

‘महाराष्ट्र सदन’ प्रकरणात मोठमोठे आकडे सांगून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला. पण प्रत्यक्षात महाराष्ट्र सदन उभारण्यात सरकारचा एकही पैसा खर्च झालेला नाही, असंही भुजबळ म्हणाले.

दरम्यान, ‘महाराष्ट्र सदन’ प्रकरणात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना अडीच वर्षे तुरूंगवास भोगावा लागला आहे.

महत्वाच्या बातम्या –

-विराट कोहलीला बाद ठरवण्याचा पंचांचा निर्णय साफ चुकीचा; सोशल मीडियावर एकच राडा

-मला भावी मुख्यमंत्री म्हणू नका; अजित पवारांची कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती

-कोण जिंकणार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी?, काय आहे सद्यस्थिती??? 

भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा; सिंधूनं साऱ्या देशाची मान उंचावली

-राफेल प्रकरणी ‘भाजप’ देशभरात एकाच वेळी करणार ही रेकाॅर्डब्रेक कृती