Loading...

नेत्यांचं पक्षांतर थांबता थांबेना! राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा भाजप प्रवेश फिक्स

सोलापूर | विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त साधून आघाडीचे अनेक नेते भाजपवासी होत आहेत. सांगोल्यातही राष्ट्रवादीला मोठा झटका बसला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते चेतनसिंह उर्फ बाळासाहेब केदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पंढरपुरमध्ये होणाऱ्या भाजप मेळाव्यात चेतनसिंग भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत.

Loading...

चेतनसिंह हे विद्यमान नगरसेवक आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष आहेत. माजी उपनगराधक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. त्यामुळे चेतनसिंह यांच्या भाजप प्रवेशाने सांगोला तालुक्याचं मोठं नुकसान होणार असल्याच्या चर्चा आहेत.

दरम्यान, काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक आमदार येत्या आठवड्याभरात राजीनामा देणार आहेत, असा गौप्यस्फोट करत भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

-मायावतींच्या भावाला आयकर विभागाचा दणका; केली मोठी कारवाई

-“विधानसभेसाठी ‘वंचित’सह सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणणार म्हणजे आणणार”

-वर्ल्डकपनंतर लगोलग BCCI ने विराट कोहलीला दिला मोठा धक्का!

Loading...

-पार्थ पवार विधानसभेची निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणतात..

-‘त्यानं’ षटकार मारला अन् दुर्दैवाने त्याचवेळी त्याच्या गुरूंनी प्राण सोडला!

Loading...