Top News

‘भाजपमधील 70 टक्के आमदार हे राष्ट्रवादीचेच’; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

मुंबई | येत्या काही दिवसात तुमचे आमदार आमच्याकडे येतील हे तुम्हाला कळणारही नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यानंतर भाजपकडून पवारांवर टीका झाली. मात्र अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

भाजपमधील 70 टक्के आमदार राष्ट्रवादीचेच आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार याबद्दल निर्णय घेतील, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. याआधी अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आमदारांच्या इमकमिंगबाबत वक्तव्य केली आहेत.

आजी माजी आमदार हे राष्ट्रवादीत येण्यासाठी शरद पवारांकडे इच्छा व्यक्त करत असतील. पण राष्ट्रवादीत कोणाला घ्यायचं आणि कोणाला थांबवायचं याचा निर्णय पवार घेणार असल्याचं भुजबळ यांनी संगितलं.

दरम्यान, भाजपचे 70 टक्के आमदार राष्ट्रवादीचेच आहेत,  भुजबळ यांनी या दाव्यावर भाजपकडून काय प्रतिक्रया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी अखेर भाई जगताप यांची नियुक्ती

“कंगणाला दिवसातून एकदा माझं नाव घेतल्याशिवाय जेवण पचत नाही”

सीरम इन्स्टिट्यूटच्या अदर पुनावालांनी पंतप्रधान मोदींकडे केली ‘ही’ मोठी मागणी

“शिवसेना हा अस्तित्त्व संपत चाललेला पक्ष”

रतन टाटा यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल गौरवोद्गार; म्हणाल…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या