“माझ्या सारख्या नेत्याला कधीच वाटणार नाही की शिवसेना संपायला हवी”
नाशिक | शिवसेना संपुष्टात येणार का? शिवसेना कणाची? असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. शिवसेनेची गळती अजूनही चालू आहे. अशात शिवसेनेला आणखी धक्का बसला आहे. ठाणेमधील 66 माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा एक धक्का शिवसेनेला आज बसला आहे.
नवीन सरकारमध्ये काही चांगलं होणार असेल तर आम्ही काही वाईट बोलणार नाही. या गोष्टी न्यायालयात होतील. न्यायालयाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. नियोजन समिती अंतर्गत वाटप करण्यात आलेला निधी सगळ्यांना समान देण्यात आला आहे. शिंदे सरकारकडून आता तो रद्द करण्यात आला आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.
आता सध्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. यावर ते म्हणाले मी पूर्वीपासून शिवसेनेत आहे. शिवसेना तुटावी किंवा नष्ट व्हावी, असं मला वाटत नाही. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे ते एकत्र बसून निर्णय घेतील, असंही ते म्हणाले.
मी आज नाशिकमध्ये माझ्या मतदारसंघात आलोय. राज्यातील पावसाचं प्रमाण वाढत आहे. मात्र नाशिकमध्ये म्हणावं इतका पाऊल पडला नाही. नाशिकमध्ये 150 मिलीलीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पेरण्या झाल्या पण पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. गंगापूर धरणात 28 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. मंत्री नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्याव, असं त्यांनी माध्यामाशी बोलताना सांगितलं.
थोडक्यात बातम्या
शिंदे सरकारचा अजित पवारांना दणका; घेतला मोठा निर्णय
‘शरद पवारांचं कौतुक नाही करायचं तर कोणाचं करायचं?’; राऊतांचा बंडखोर आमदारांना टोला
काळीज पिळवटून टाकणारी घटना; 6 वर्षाच्या चिमुकल्याने आईच्या डोळ्यादेखत जीव सोडला
शिवसेनेला आणखी एक झटका; ‘या’ नेत्याने दिला राजीनामा
मुंबईकरांसाठी पुढील 5 दिवस महत्त्वाचे; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा
Comments are closed.