महाराष्ट्र मुंबई

जितेंद्र आव्हाडांचं जागतिक आरोग्य संघटनेवर जोरदार टीकास्त्र; म्हणाले…

मुंबई | जागतिक आरोग्य संघटनेनं पुढे ही परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता वर्तवली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी थेट जागतिक आरोग्य संघटनेवरच निशाणा साधला आहे.

सुरूवातीपासूनच केरोना माहामारीच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना लोकांना धीर देण्याऐवजी घाबवरण्याचं काम करत आहे. सुरूवातीला करोना विषाणू तितका धोकादायक नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं आणि सारखं ते आपलं वक्तव्य बदलत आहेत, असं म्हणत आव्हाड यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर टीकास्त्र सोडलंय.

जागतिक आरोग्य संघटनेनं सर्व देशांना इशारा दिला होता. मूलभूत नियमांच पालन न केल्यास याचे परिणाम गंभीर ते अतिगंभीर होतील, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं होतं.

कोरोनामुळे जगभरात निर्माण झालेली आणीबाणीची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली नसताना जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी परिस्थिती अजून गंभीर होईल असा इशारा दिला होता.

 

महत्वाच्या बातम्या-

औरंगाबादच्या तरुणाच्या वेबपोर्टलची किमया; कोरोना काळात थेट गुगलनं केली आर्थिक मदत

‘भारताच्या जागतिक धोरणाची लक्तरे झालीयेत’; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

मुलीचं प्रेम बापाला नव्हतं मान्य; पुण्यात प्रियकराची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या

‘दोन दिवसात उत्तर द्या अन्यथा…’, सचिन पायलट यांना काँग्रेसची नोटीस

…म्हणून 25 वर्षीय महिलेनं महिला पोलिसाचा हात पिरगळला; महिलेला अटक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या