बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादीचे नेते डॉ. अब्दुल गफ्फार मलिक यांचं दु:खद निधन; राष्ट्रवादीचं आग्रही मुस्लिम नेतृत्व हरपलं

मुंबई |  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे माजी राज्यप्रमुख हाजी डॉ. अब्दुल गफ्फार मलिक यांचं निधन झालं आहे. सोमवारी रात्री त्यांचं अल्पशा आजारानं निधन झालं आहे. किरकोळ आजारपणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे उपचार सुरू असतानाच मलिक यांची प्रकृती खालावली आणि त्यांनी रूग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.

‘मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य राहिलेल्या डॉ. गफ्फार मलिक यांनी मुस्लीम मणियार बिरादरी तसेच तालिम-ए-अंजुमन व इकरासारख्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील मुस्लीम युवक-युवतींच्या उच्चशिक्षणासाठी व औद्योगिक प्रशिक्षणासाठी आयुष्यभर अथक परिश्रम केले. राजकीय क्षेत्रातील संयमी तसेच आग्रही नेतृत्व त्यांच्या जाण्याने हरपले आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रति सहसंवेदना आहेत’, असं ट्विट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

हाजी गफ्फार मलिक यांनी जळगाव महापालिकेत नगरसेवक पदासह विविध समितींचं अध्यक्षस्थान भूषवलं होतं. तत्कालीन आमदार सुरेश जैन यांचे ते विश्वासू होते. मात्र, सुरेश जैन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल्यानंतर, मलिक मात्र पक्षाशी एकनिष्ठ राहिले. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या वाईट काळातही गफ्फारभाई पक्षासोबत उभे होते. त्यांना राष्ट्रवादीचं आग्रही मुस्लिम नेतृत्व समजलं जात होतं.

दरम्यान, शरद पवार यांनी त्यांच्यावर अल्पसंख्यांक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली. ती त्यांनी समर्थपणे सांभाळली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील मुस्लीम चेहरा म्हणून ओळखले जाणारे गफ्फार मलिक यांनी 2014 मध्ये यावल-रावेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

थोडक्यात बातम्या-

आमदार रोहित पवारांचा ‘झिंगाट डान्स’, कोरोना रूग्णांसोबत धरला ठेका; पाहा व्हिडीओ

दिलासादायक! मुंबईची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

ॲलोपॅथी-आयुर्वेद वाद पुन्हा पेटला?; रामदेव बाबांनी IMAला खुलं पत्र लिहुन विचारले ‘हे’ प्रश्न

लॉकडाऊनमध्ये दुकान सुरू ठेवल्याने महिला जिल्हाधिकाऱ्यांची मुजोरी, पाहा व्हिडिओ

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात लहान मुलांना होतोय कोरोनाचा संसर्ग; तब्बल 166 मुलं कोरोनाबाधित

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More