Top News कोरोना

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे कोरोना पॉझिटीव्ह

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. एकनाथ खडसे यांनी कोरोना टेस्ट करून घेतली असता या टेस्टचा अहवाल पॉझिटीव्ह आली आहेत.

एकनाथ खडसे यांना 30 डिसेंबर रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहणार होते मात्र कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने ते मुंबईला आहेत. एकनाथ खडसे यांनी पत्राद्वारे स्वतः याला दुजोरा दिलाय. खडसे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लक्षणं जाणवली आहेत.

एकनाथ खडसे यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असून मुंबईतील निवासस्थानी सोमवारी आणि मंगळवारी आराम केलाय. गेल्या 2-3 दिवसांपासून कोणाच्याही संपर्कात नाहीयेत.

याअगोदर एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. 19 ऑक्टोबर रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली असता त्यांनी काही दिवसांत कोरोनावर मात केली होती.

थोडक्यात बातम्या-

“गौरी तू ज्यामुळे हा निर्णय घेतला त्यांना नक्की शिक्षा मिळणार; कुणी रक्ताचं असलं तरी”

बनावट कागदपत्र, आधार कार्ड, बनवत योगींच्या राज्यात पाकिस्तानी महिला झाली सरपंच

“गौरी तू ज्यामुळे हा निर्णय घेतला त्यांना नक्की शिक्षा मिळणार; कुणी रक्ताचं असलं तरी”

“काँग्रेस पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस वाळवी सारखं पोखरतोय”

औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करण्यास काँग्रेसचा विरोध- बाळासाहेब थोरात

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या