मुंबई | कोरोनाच्या या संकटातही स्वत: ला झोकून देऊन पोलीस, वैद्यकीय कर्मचारी असे अनेक लोकांची सेवा करत आहे. सर्वच स्तरावरुन त्यांचं कौतुक होत आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी एका नर्सचा व्हायरल व्हिडीओ ट्विट केला आहे.
जयंत पाटील या ट्विट केलेल्या या व्हिडीओत नर्स कोरोनाची लागण झालेल्या लहान बाळाला हसवताना दिसत आहे. तर या व्हिडीओत नर्सने कोरोना रुग्णाला बघायला जातानाचा ड्रेस परिधान केला आहे. तिच्या तोंडाला मास्कही लावण्यात आला आहे. ही नर्स त्या बाळाला त्याचे नाव विचारताना, त्याच्यासोबत खेळताना दिसत आहे.
कोरोनाच्या विळख्यातून लहान मुलांपासून वयस्कर लोकंही सुटलेली नाहीत. या सर्व रुग्णांची जबाबदारी देशातील वैद्यकीय क्षेत्राने आपल्या खांद्यांवर झेलली आहे. तहान-भूक विसरून, घरदार सोडून, न थकता हे रक्षक झटतायत. सकारात्मकता काय असते ते पहाच व्हायरल झालेल्या या व्हिडिओत. सलाम या वीरांना!, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडीओ नेमका कोणत्या शहरातील आहे, त्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे का? याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
ट्रेंडिंग बातम्या-
मी माझ्या महाराष्ट्राला कोरोनापासून वाचवेन पण तुम्हाला सोडणार नाही- उद्धव ठाकरे
“महाराष्ट्रातील लॉकडाउनचा कालावधी ‘इतक्या’ दिवसांनी वाढवला जाऊ शकतो”
महत्वाच्या बातम्या-
परराज्यातील मजुरांना मुख्यमंत्र्यांचं अभय; दिली ही महत्त्वाची माहिती
…म्हणून मुख्यमंत्र्यांनी केलं सोलापूरच्या सात वर्षीय आराध्याचं कौतुक!
भाजपवाल्यांनो, मी हिंदू आहे आणि हिंदू म्हणूनच मरणार; जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
टेलिग्रामवर सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच पुढील लिंकवर क्लिक करा- https://t.me/thodkyaatNews
Comments are closed.