Top News

बीडमध्ये कार्यक्रम राष्ट्रवादीचा,आमंत्रण मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडेना! चर्चांना उधाण

बीड | बीडमध्ये आज विविध विकास कामांचं उद्घाटन होत आहे. होऊ घातलेला कार्यक्रम तसा राष्ट्रवादीचा आहे पण या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याला निमंत्रण नाही. तर दुसरीकडे मात्र या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे हे दोघेजण या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावणार आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होत आहे. मात्र या कार्यक्रमात एकाही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्याला स्थान देण्यात आलेलं नाही.

बीड जिल्ह्यातील भाजपच्या सगळ्या आमदारांचे फोटो शहरांमध्ये लावलेल्या बॅनरवर स्पष्टपणे झळकत आहेत. या निमित्ताने राष्ट्रवादीच्या अंतर्गत असणारी खदखद पुन्हा एकदा बाहेर आली आहे.

या कार्यक्रमाचं जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याला निमंत्रण देण्यात आलं नाही. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना राष्ट्रवादीतली अंतर्गत धुसपुस चव्हाट्यावर आलेली दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धर्मनिरपेक्ष संघटना असेल तर मी इंग्लंडची राणी”

-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अखेर सुटला!, असा असेल फाॅर्म्युला?

-“…तर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करीन”

-सामनाच्या अग्रलेखातून प्रकाश आंबेडकर आणि आनंद तेलतुंबडेंवर जोरदार टीकेचे ‘बाण’

नाशिकच्या तरुणांनी बनवली अनोखी स्पोर्टस कार; भारतातले पहिलेच डिझाईन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या