मुंबई | कोरोनाविरोधात लढताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना 9 मिनिटांचा वेळ मागितला होता. 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता आपल्या घराबाहेर दिवा पेटवण्याचं त्यांनी देशवासीयांना आवाहन केलं होतं. या आवाहनाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री 9 वाजताचा महाड येथी चवदार तळ्याचा फोटो ट्वीट करून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
संकटाशी लढताना अंधार दूर लोटायचा असतो. ज्ञानसुर्य (डॉ.बाबासाहेब आंबेडकर) तेव्हाही तळपत होताच… आजही तळपतोच आहे. महाडची परंपरा कायम, #जय_भीम #अब_आगे_क्या, असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
अंधारात कधीही चांगली कामं होत नाहीत. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप. तेव्हा अंधार करू नका. अंधारात पाप करायची संधी देऊ नका. दान हे पुण्य आहे. ते उजेडात करा’, असं म्हणत त्यांनी मोदींच्या आवाहनाची खिल्ली उडवली होती.
जे लाखो डॉक्टर्स, नर्स, वोर्डबॉय, पोलीस, सफाई कामगार, पाणी पुरवठा, वीज पुरवठा या सगळीकडे काम करणारे लोक आहेत. त्यांच्या समर्थनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये फक्त 101 रुपये द्या आणि त्याचा स्टेट्स आपल्या व्हॉट्सॲप, फेसबुकवर अभिमानाने ठेवा, अशी विनंतीही त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला केली आहे.
हा आहे ९ वाजताचा महाडच्या चवदार तळ्याचा फोटो. .ज्ञानसुर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा. .संकटाशी लढताना अंधार दूर लोटायचा असतो
हा ज्ञानसुर्य तेव्हाही तळपत होताच. .आजही तो तळपतोच आहे.
महाडची परंपरा कायम.#जय_भीम #अब_आगे_क्या pic.twitter.com/LE7pc3eW0Y— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 5, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
कोरोनाला पळविण्यासाठी भाजपच्या महिला अध्यक्षाचा हवेत गोळीबार, पाहा व्हिडीओ
सांगलीत दिवे लावण्याच्या कारणावरुन जोरदार हाणामारी
महत्वाच्या बातम्या-
आजची धक्कादायक बातमी; महाराष्ट्रात एका दिवसात कोरोनाचे 113 नवे रुग्ण
मोदींच्या आवाहनाला देशवासीयांचा प्रतिसाद; घराघरात पेटले दिवे
सांगलीकरांसाठी मोठा दिलासा; इस्लामपूरमधील 4 कोरोना रुग्ण ठणठणीत बरे
Comments are closed.