बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“फुकट वडापाव खाणाऱ्यांनो तुमची शहर सांभाळण्याची औकात नाही”

ठाणे | भाजप मंत्री, खासदार व आमदारांनी ठाण्यातील गजानन वडापाव सेंटरमध्ये कार्यकर्त्यांसोबत नाष्टा केला. भाजप नेत्यांचा हा व्हि़डीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

वडावापचे पैसे न दिल्याने चांगलाच वाद पेटला होता. त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते भुजबळ यांनी बिलाचे पैसे देत प्रकरण सावरण्याचा प्रयत्न केला. भाजप नेत्यांच्या या व्हिडीओवरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

फुकट वडापाव खाणाऱ्यांची तुमची शहर सांभाळण्याची औकात नाही, अशी खरमरीत टीका जितेंद्र आव्हाडांनी केली आहे. उल्हासनगरमधील एका कार्यक्रमात बोलताना आव्हाडांनी भाजप नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

दरम्यान, भाजप नेते व कार्यकर्त्यांनी मिळून 200 पेक्षा जास्त वडापाव व भजीपाव खाल्ले. या सर्वाचं बिल 3950 रूपये झालं पण भाजप नेते बिल न भरताच तिथून निघून गेले. त्यानंतर सारवासारव करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी जाऊन बिल भरले व बिल भरल्याचं जाहीर केलं.

थोडक्यात बातम्या-

Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आजचे ताजे दर

शिवजयंती उत्सवाबाबत उद्धव ठाकरेंचे महत्वाचे निर्देश, पाहा काय आहे नियमावली?

“संजय राऊतांचा हेतू संशयास्पद, त्यांना मातोश्री डळमळीत करायची आहे का?”

औरंगाबादेत घुमला शिवरायांच्या नावाचा जयघोष, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वाधिक उंच पुतळ्याचं अनावरण

सुशांत सिंह प्रकरणावर नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More