बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हा छत्रपतींचा महाराष्ट्र, अंगाशी खेटू नका नाहीतर गाठ आमच्याशी आहे”

मुंबई | कर्नाटकमधील बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. गुरुवारी रात्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर काळा रंग टाकत आला होता. या घटनेनं शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. या घटनेचे पदसाद महाराष्ट्र बंगळुरूसह संपू्र्ण देशभर उमटताना दिसत आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.

मी दिवसभर वाट पाहिली, कर्नाटकमध्ये ज्या पक्षाचं सरकार आहे त्यांच्यातला एखादा तरी पुढारी बंगळुरू येथील छत्रपती महाराजांच्या पुतळ्याची समाजकंटकांकडून झालेल्या विटंबनेबद्दल निषेध करेल. पण असं झालं नाही. तिथल्या मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली. त्याबाबतीत काही बोलतील पण नेभळटांकडून ते ही झालं नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

होय, छत्रपती शिवरायांचा मराठी जनतेलाच नव्हे संपूर्ण जगाला अभिमान आहे.  जेव्हा आमच्या जिवापाड जपलेल्या अस्मितेला तुम्ही हानी पोहोचवणार तेव्हा आम्ही पेटून उठणारच. आत्ताच सांगतो तुम्ही कुणीही असाल हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे अंगाशी खेटू नका गाठ आमच्याशी आहे, असा थेट इशारा आव्हाडांनी दिला आहे.

दरम्यान, कर्नाटकात झालेल्या या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक केला. तसेच बोम्मई यांच्या प्रतिमेला चप्पलांनी मारलं, त्यामुळे देखील वाद निर्माण झाला आहे.

थोडक्यात बातम्या-

“हिंमत असेल तर राजीनामा आणि मैदानात या”, अमित शहांचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान

आरारारा खतरनाक! पाणीपुरीत कोणी मिरिंडा घालतं का?; पाहा भन्नाट व्हिडीओ

“गुलाबराव पाटलांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा…”, रुपाली चाकणकरांचा थेट इशारा

‘वय वाढलं पण त्यांची बुद्धी…’; उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंवर हल्लाबोल

केरळमध्ये तणावाचं वातावरण! ‘त्या’ गंभीर घटनेमुळे कलम 144 लागू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More