ठाणे | प्लास्टिक बंदीची हुकूमशाही पद्धतीने अंमलबजावणी नको, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्लास्टिक बंदीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यासंदर्भात फेसबुकवरुन नागरिकांशी संवाद साधला.
प्लास्टिक बंदीमधील रोख दंड आकारण्याच्या मुद्द्यावर त्यांनी आक्षेप घेतला. प्लास्टिक बंदी योग्य आहे, मात्र दंडाची रक्कम आणि शिक्षेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, प्लास्टिक बंदीच्या याच मुद्द्यावरुन मनसे आणि नितेश राणे यांनीसुद्धा सरकारला लक्ष्य केलं आहे. दंडाची रक्कम कमी करण्याची मागणी होतेय.
महत्त्वाच्या बातम्या –
-तुमचा ‘शुजात बुखारी’ व्हावा असे वाटते का?; भाजप आमदाराची पत्रकारांना धमकी
-मनसेची ‘मातोश्री’बाहेर पोस्टरबाजी; वाचा नेमकं लिहिलंय काय….
-…म्हणून दाऊदबद्दल भारतीय पुढाऱ्यांची तोंडं बंद; सुब्रमण्यम स्वामींचा गौप्यस्फोट
-भाजप आणि संघाने दुखावलेले प्रवीण तोगडिया आज मोठी घोषणा करणार
-तृप्ती देसाई यांची सहकारी माधुरी शिंदे यांची पतीकडूनच हत्या