औरंगाबाद महाराष्ट्र

मेहबूब शेख यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार देणारी तरुणी गायब!

औरंगाबाद | राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार देणारी तरुणी गायब झाल्याचं कळतंय.

तरुणीने तक्रारीत म्हटले होते की, 10 नोव्हेंबर रोजी मला फ्लॅटवर भेटण्यासाठी बोलावलं आणि 14 नोव्हेंबरच्या रात्री 9 वाजण्याच्या सुमारास भेटण्याच्या उद्देशाने गाडीत बसवून निर्जन ठिकाणी नेत बलात्कार केला. तरुणीने याबाबत औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात तक्रा दिली होती. त्यानुसार सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर गेल्या आठवड्यात शेख यांनी व्हिडीओ शेअर करत याबाबत खुलासा केला होता. संबंधित तरुणीशी माझा कसलाही संबंध नाही. मी तिला कधीही पाहिलं नाही किंवा भेटलेलो नाही. एखाद्या व्यक्तीने एवढ्या मेहतीने उभं केलेलं राजकीय आयुष्य इतक्या घाणेरड्या आरोपांनी उध्वस्त करु नये, असं मेहबूब शेख म्हणाले होते.

गरज पडली तर माझी नार्को टेस्टचीही तयारी आहे आणि जर आरोप सिद्ध झाले तर मी फासावर जायला तयार आहे, असं मेहबूब शेख यांनी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या-

….म्हणून त्याने भररस्त्यावर गर्लफ्रेंडवर गोळी झाडून नंतर स्वत: आत्महत्या केली; मुंबईतील घटनेने खळबळ

शिवसेनेचा आणखी एक नेता ‘ईडी’च्या रडारवर?

कदाचित उद्या मलाही ईडीची नोटीस येईल- रोहित पवार

पुढचे दोन दिवस राज्यातील ‘या’ भागात पावसाचा इशारा!

‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’; शिवसेनेची गुजराती मतदारांना साद

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या