मुंबई | गेल्या चार दिवसांपासून मुंबईत सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वसामान्यांच जनजीवन विस्कळीत झालं आहेच. मात्र या त्रासातून नेतेमंडळीही सुटली नाही.
मुंबईत 48 तासांपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरात रात्रीपासून पाणी साचलं आहे.
नवाब मलिक यांनी त्यांच्या घरात पाणी साचल्याचे काही फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. त्यांनी ते फोटो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावरुन नवाब मलिक यांनी घरातील फोटो पोस्ट केले त्याला ‘माझं घर….’ आणि ‘करुन दाखवलं’ असं कॅप्शन दिलं आहे.
My home @uddhavthackeray @ShivSena @CMOMaharashtra @MCGM_BMC
Karun dakhavla@MumbaiNCP @NCPspeaks #MumbaiRainsLive #MumbaiRains pic.twitter.com/372GbptoPQ— Nawab Malik (@nawabmalikncp) July 1, 2019
महत्वाच्या बातम्या-
-चक्क अमित शहांच्या प्रस्तावाला ममता बँनर्जींचा पाठिंबा!
-हिंदूंनो, मुस्लिम महिलांवर घरात घुसून बलात्कार करा; भाजप कार्यकर्तीचं संतापजनक वक्तव्य
-…तर मला आत्ता लगेच अटक करा; सिसोदिया यांचं दिल्ली भाजपाध्यक्षांना आव्हान
-…तर अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार; कृषीमंत्र्यांच शेतकऱ्यांना आश्वासन
Comments are closed.