Top News महाराष्ट्र मुंबई

लवकरच भाजपला मोठी गळती, भाजपचे काही आमदार राष्ट्रावादीच्या वाटेवर- नवाब मलिक

मुंबई | महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर तेव्हापासून विरोधी पक्ष भाजपने हे सरकार इतक्या इतक्या दिवसात पडणार असल्याचं वारंवार म्हटलं होतं. मात्र सध्या काही वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांनी भाजपचेच काही आमदार संपर्कात असल्याचं सांगितलं आहे.

भाजपचे काही आमदार लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. योग्य वेळी त्यांची नावे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जाहीर करतील, असं राष्ट्रवादीचे नेते आणि मंंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिकांअगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात, येत्या चार महिन्यात आमच्याकडून तुमच्याकडे गेलेले अनेक जण राजीनामा देऊन परत आमच्याकडे येतात की नाही हेच बघा, असं म्हटलं होतं.

दरम्यान, भाजपमधील 70 टक्के आमदार हे राष्ट्रवादीचेच असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“… तर 1000 कोटी रुपये खर्चून नवीन संसद भवनाचा थाट कशासाठी”

“राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये जाऊन काँग्रेसने लाचारी पत्करली”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी साधणार संवाद

‘भाजपमधील 70 टक्के आमदार हे राष्ट्रवादीचेच’; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी अखेर भाई जगताप यांची नियुक्ती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या