हल्लाबोल आंदोलनानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांचाच एकमेकांवर हल्ला!

पिंपरी | राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनानंतर राष्ट्रवादीच्याच दोन नेत्यांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला. माजी आमदार आण्णा बनसोडे आणि माजी नगरसेवक काळुराम पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला. 

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचं भाषण सुरु असतानाच या दोन नेत्यांमध्ये वाद झाला होता, असं कळतंय. मात्र त्यांनी कार्यक्रम संपण्याची वाट पाहिली आणि त्यानंतर राडा केला. यामध्ये एकमेकांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आलीय. 

दरम्यान, राड्यानंतर तक्रार देण्यासाठी दोन्ही नेते पोलीस ठाण्यात पोहोचले होते. मात्र आमची एकमेकांविरुद्ध काहीच तक्रार नाही, असं लिहून देत त्यांनी पोलीस ठाण्यातून काढता पाय घेतला.