मुंबई | नवीन वर्षाच्या सुरूवातीला अभिनेत्री कंगणा राणावत आणि उर्मिला मातोंडकर यांच्यात वाद झाला. ट्विटच्या माध्यमातून दोघींमध्ये शाब्दिक झालेली पाहायला मिळाली. अशातच राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते रोहित पवार यांनी या वादामध्ये उडी घेतली आहे.
कंगणा राणावतने केलेल्या टीकेवर उर्मिला मातोंडकरांनी दिलेल्या प्रत्युत्तराचा स्क्रीनशॉट रोहित पवारांनी शेअर करत भाजपवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात रोहित पवारांनीही ट्विट केलं आहे.
भाजपला खूश करण्यासाठीच महाराष्ट्राची बदनामी केल्याची कबुली देऊन महाराष्ट्रद्रोही असणाऱ्या महाराष्ट्रातील भाजपचा मुखवटा टरकावत खरा चेहरा पुढं आणल्याबद्दल कंगणाचं अभिनंदनच करायला पाहिजे, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या द्रोहाबद्दल भाजपला काय शिक्षा घ्यायची ते आता राज्याची स्वाभिमानी जनताच ठरवेल, असा टोलाही पवरांनी लगावला आहे.
भाजपला खूश करण्यासाठीच महाराष्ट्राची बदनामी केल्याची कबुली देऊन #महाराष्ट्रद्रोही @BJP4Maharashtra चा मुखवटा टरकावत खरा चेहरा पुढं आणल्याबद्दल @KanganaTeam चं अभिनंदनच करायला पाहिजे. या द्रोहाबद्दल भाजपला काय शिक्षा द्यायची ते आता राज्याची स्वाभिमानी जनताच ठरवेल!@UrmilaMatondkar pic.twitter.com/243kmxDGJ8
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 4, 2021
थोडक्यात बातम्या-
“आम्हाला महापालिकेत सत्ता द्या पहिल्या बैठकीत संभाजीनगरचा ठराव मंजूर करू”
…म्हणून मी या घडीला कोरोनाची लस न घेण्याचा निर्णय घेतला- शिवराज सिंह चौहा
हाडे गोठवणाऱ्या थंडीतही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू, 39 दिवसांत 54 शेतकऱ्यांचा मृत्यू
महत्त्वाची बातमी! पुण्यातल्या शाळा आजपासून सुरू
…तोपर्यंत मनसेसोबत युती शक्य नाही- चंद्रकांत पाटील