महाराष्ट्र मुंबई

या प्रश्नासाठी शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट!

मुंबई | राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत.

शरद पवारांनी याआधी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले होते. या पत्रात पवारांनी राज्यातील दुष्काळावर उपाययोजना करण्याच्या सुचना राज्य सरकारला दिल्या होत्या.

चाराछावणीसाठी प्रती जनावर दिले जाणारे अनुदान कमी असल्याने त्यात वाढ करण्याची मागणी पवारांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये केली होती. तसेच शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न पवारांनी मुख्यमंत्र्यांजवळ पत्राद्वारे मांडले होते.

दरम्यान, राज्यात लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर शरद पवार दुष्काळ दौऱ्यावर गेले होते.

महत्वाच्या बातम्या

-“कुलदीप यादव आणि माझ्या यशामागे धोनी”

-धोनीने दिलेल्या अनेक टीप्स अपयशी ठरतात; ‘या’ क्रिकेटपटूचा खुलासा

-बरं झालं पश्चिम बंगालमुळे भाजपला लोकशाही आठवली- संदिप देशपांडे

-दुष्काळी उपाययोजनांबाबत शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना दुसरे पत्र

-“कोलकात्यातील हिंसाचाराला पश्चिम बंगालमधील सरकार जबाबदार”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या