बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राष्ट्रवादीला निवडणुकांमध्ये अधिक जागा मिळाव्यात अशी तरुणांची अपेक्षा”

सातारा | आगामी काळात राज्यात बऱ्याच निवडणुका (Elections) होणार आहेत. या दृष्टीनं सध्या सर्व पक्षांनी आपापली तयारी चालू केली आहे. काॅंग्रेससोबत आता राष्ट्रवादीच्या (NCP Workers) गोटातूनही सर्वाधिक जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांच्याकडं राष्ट्रवादीच्या युवकांनी सर्वाधिक जागा जिंकण्याबाबत आपलं म्हणणं मांडलं आहे.

राज्यातील जिल्हा बॅंकांच्या निवडणूक निकालानंतर शरद पवार सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पवार यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर आपली मत मांडली आहेत. तरूणांच्या मागणीवर पवार म्हणाले की, या तरुण मुलांना निवडणुकांमध्ये अधिक जागा मिळाव्यात अशी अपेक्षा साहजिकच आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. त्यामुळे आगामी निवडणुका कशा लढवायच्या याबाबत राज्यातील पक्षाचे नेते पुढील काळात एक धोरण ठरवतील.

राज्यात चालू असलेल्या एसटी कामगारांच्या संपावर पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एसटीची आर्थिक स्थिती सध्या बिकट आहे. पण स्थापनेनंतर एसटी स्वतःच्या ताकदीवर व प्रवाशांच्या पाठिंब्यावर पुढे जात होती. एसटीला राज्याकडून कधीही अ‍ॅडव्हान्स घ्यावा लागला नव्हता. सरकारने वेतन देण्यासाठी एसटीला 500 कोटी दिले अशी स्थिती कधी आली नव्हती, असं शरद पवार म्हणले आहेत. एसटीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासंदर्भात आणि एसटी कामगारांच्या मागणीबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी मी चर्चा केली. विलिनीकरणाबाबत उच्च न्यायालयाने एक समिती गठीत केली आहे. त्यांना काही मुदत देण्यात आली आहे, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, शरद पवार यांनी एसटी कामगारांच्या प्रश्नावर आपली स्पष्ट मतं मांडली आहेत. इतर राज्यांप्रमाणं वेतन कसं देता येईल त्यावर राज्य सरकार सकारात्मक विचार नक्की करेल, असं पवार म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या 

कोण सांभाळणार मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी?, ‘या’ दोन नावांची चर्चा!

निवडणूक जिंकली मात्र घरच्यामुळे आयुष्याची लढाई हरली, उचललं टोकाचं पाऊल

नाना पटोलेंचा महाविकास आघाडीला दणका, स्वबळावर निवडणूक लढवण्याचे आदेश

अनिल देशमुखांना मोठा दिलासा?, परमबीर सिंहांबाबत धक्कादायक माहिती उघड

राज्याच्या राजकारणात नवे संकेत, फडणवीस-ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More