महाराष्ट्र मुंबई

राष्ट्रवादीला धक्क्यावर धक्के! शिवेंद्रराजेंनी दिला राजीनामा

मुंबई | साताऱ्यातील जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी अखेर आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मुंबईत विधानसभा सभापती हरिभाऊ बागडेंकडे त्यांनी राजीनामा सुपूर्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: शिवेंद्रराजेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र साताऱ्याचे खासदार उदयनराजेंशी असलेल्या वादामुळे आपण राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं.

शिवेंद्रराजेंनी रविवारी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. कार्यकर्त्यांनी एक मताने त्यांना भाजपमध्ये जाण्याचा कौल दिला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला एका पाठोपाठ बसणारे धक्के काही थांबण्याचं नाव घेत नसल्याचं दिसतंय.

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेसच्या सत्यजीत तांबेंना उचलायचाय विखेंना हरवण्याचा विडा!

-‘सीसीडी’चे मालक बेपत्ता; सापडलं भावनिक पत्र

-पुलवामा हल्ल्याच्यावेळी मोदी ‘मॅन वर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमाच्या चित्रिकरणात व्यस्त???

-गणेश नाईक यांच्या भाजपप्रवेशाआधीच आमदार मंदा म्हात्रे आक्रमक!

पदभार स्विकारल्याक्षणी राष्ट्रवादीच्या नव्या प्रदेशाध्यक्षा सरकारविरोधात आक्रमक!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या