महाराष्ट्र मुंबई

सरकारच्या सूचनांचं पालन करा, बाहेर पडू नका; सुप्रिया सुळेंचं जनतेला आवाहन

मुंबई | सरकार आणि प्रशासन आपली सर्वतोपरी काळजी घेत आहे. सर्वांनी आपली काळजी घ्यावी आणि सुरक्षित राहावं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

अरबी समुद्रात तयार झालेलं निसर्ग हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर येत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील नागरिकांनी कृपया घरातून बाहेर पडू नये. घाबरुन न जाता सरकारकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला धोका निर्माण झाला असून प्रशासनासोबत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उभे रहावं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, वादळी वाऱ्यांचा तडाखा बसल्याने सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या लोकांना तात्काळ मदतीचा हात द्यायला हवा, असंही शरद पवार यांनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या डॉक्टरांना कोरोना योद्धा जाहीर करा”

असाल तुम्ही सर्वेसर्वा पण…; राज्यपालांविरुद्ध मनसे नेत्या रूपाली पाटील आक्रमक

महत्वाच्या बातम्या-

“सुरुवातीच्या काळातच एवढ्या मोठ्या संकटांना तोंड देणारा मुख्यमंत्री दुसरा कोणी नसेल”

रायगडच्या किनारपट्टी भागात वादळी पावसाला सुरुवात; श्रीवर्धन, अलिबागमध्ये तुफान पाऊस

‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचं महत्त्वाचं आवाहन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या