Top News महाराष्ट्र मुंबई

“हे यश म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती”

मुंबई | विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात अनपेक्षिपणे भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे बालेकिल्ला असलेल्या पुणे आणि नागपूर हे मतदारसंघ भाजपला गमवावे लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविला. आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास टाकल्याबद्दल मतदारांचे मनापासून आभार. हे यश म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती असल्याचं सुप्रिया सुळ यांनी म्हटलं आहे.

या यशासाठी अहोरात्र कष्ट करणारे कार्यकर्ते, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी कष्ट घेतले. सर्वांच्या सुनियोजित अशा संघटीत प्रयत्नांतून हा विजय साकारला असल्याचं सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गेली 20 वर्षे भाजपकडे पुणे पदवीधर मतदारसंघ होता. मात्र भाजपला तो गमवावा लागला आहे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे  उमेदवार अरूण लाड यांनी तिथे विजय मिळवला आहे

 

 

महत्वाच्या बातम्या-

‘हिंमत असेल तर एकएकटे लढा’; सत्ताधाऱ्यांना आव्हान देणाऱ्या पाटलांच्या वक्तव्यावर पवार म्हणाले…

‘चंद्रकांतदादांमुळे माझा विजय सोपा’; विजयी उमेदवार अरूण लाड यांचा टोला

आता सर्वसामान्य लोकांनीही महाविकासआघाडी सरकारला स्वीकारलं आहे- शरद पवार

‘आत्महत्या करणारे शेतकरी भेकड’; कर्नाटकच्या कृषीमंत्र्यांचं संतापजनक वक्तव्य

“…हे मुख्यमंत्र्यांचं कौतुक की अब्रू काढणं हे अजित पवार सांगू शकतात”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या