बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादीच्या नेत्याकडून जमीन लाटण्याचा प्रयत्न; शेतकरी कुटुंबाचं आमरण उपोषण

जळगाव | राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्याने केलेेले अतिक्रमण काढण्यात यावं  आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शेतकरी कुटुंब आमरण उपोषणाला बसलं आहे. चाळीसगाव येथील सायगाव येथील ही घटना आहे.

आमच्या वडिलोपार्जित जमिनीवर राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य भूषण पाटील यांनी अनेक वर्षापासून अतिक्रमण केले आहे, असा आरोप दिलीप सोनवणे आणि त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे.

सहा महिन्यांपासून आम्हांला शारीरिक, मानसिक त्रास होत आहे. त्यामुळे आमच्या मागण्या मान्य होईपर्यत आम्ही उपोषण स्थगित करणार नाहीत, असं सोनवणे कुटुंबियांनी सांगितलं आहे.

दरम्यान, या प्रकरणी पाठपुरावा करूनही कुठलीच कारवाई होत नाही. सोनवणे कुटुंबासोबत त्यांच्या घरातील आजी (वय वर्ष 90) सुद्धा उपोषणाला बसल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-काँग्रेस रस्त्यावर; अंबाबाईचं दर्शन घेऊन करणार जनसंघर्ष यात्रेला सुरूवात

-सनातन संस्थेच्या समर्थनासाठी पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा

-भारत-पाकिस्तानने चर्चेने प्रश्न सोडवावेत- इमरान खान

-… अन्यथा 1 डिसेंबरपासून पुन्हा मराठ्यांचं वादळ; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

-मुंबईत आला तर सिद्धूचे हात पाय तोडू; भाजप नेत्याचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More