Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) शरद पवारांसोबत फारकत घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून रामराजे निंबाळकर हे अजित पवारांसोबत होते. मात्र, आता स्थानिक पातळीवरील वादामुळे रामराजे निंबाळकर हे आक्रमक झाले आहेत.
स्थानिक पातळीवरील वादामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांनी आपल्या पक्षालाच इशारा दिला आहे. आपली भारतीय जनता पार्टीबरोबर भांडणं नाहीत. आपण हिंदूत्व-मुसलमान करत नाहीत. आपली तक्रार फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकरांबाबत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीच्याच नेत्याचा Ajit Pawar यांना इशारा
अजित पवार उद्या फलटण येथे असून त्यांच्या स्वागताच्या आणि कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर रामराजे यांच्या नेतृत्वाखाली फलटणमध्ये बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे साथीदार गल्लोगल्ली दहशत करत आहेत. या दहशतीला सपोर्ट करु नका, एवढीच आपली तक्रार आहे. तेवढ त्यांना सांगून बघू. फरक जर नाही पडला, तर आपल्याला तुतारी वाजवायला वेळ लागणार नाही, असा इशारा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर दिलाय.
महायुतीचा असलेल्या उमेदवाराला मदत केली नाही आणि जर भाजपचे नेते सहकार्य करत नसतील तर पक्ष श्रेष्ठींच्या कानावर घालू, नाहीतर तुतारी वाजवू, असं ते म्हणालेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ माजलीये.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने पत्नी अन् 2 मुलांसह संपवलं आयुष्य
भाजप नेत्याचे अजित पवारांवर गंभीर आरोप; दादांचं टेंशन वाढलं!
‘मी कपडे बदलताना…’; अभिनेत्रीच्या गंभीर आरोपानं खळबळ
पायाला दुखापत असतानाही शरद पवार अनवाणी पायाने जोडे मारो आंदोलनात सहभागी!
पुण्यात नदी पात्रात सापडलेल्या मृतदेहाचा अखेर उलगडा, कारण ऐकून धक्का बसेल